अकल बडी के भैस..!आंध्रामध्ये सोनू सूदच्या फोटोला चढविला हार आणि केला दुग्धाभिषेक; व्हिडीओ झाला वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक लोकांचे जीव गेले आहेत. अश्या या भयावह परिस्थितीमध्ये अनेक लोक कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याचाही समावेश आहे, अगदी गतवर्षापासून तो करत असलेल्या मदतीचा ओघ अगदी कायम आहे. कोरोना काळात लोकांचे जीव वाचवण्यासाठी ‘मसीहा’ बनून तो सातत्याने धडपड करताना दिसून येतोय. तो करत असलेल्या मदतीसाठी आभार मानताना आंध्र प्रदेशच्या चित्तूर भागात त्याच्या फोटोचा दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या ट्विटरवर चांगलाच वायरल होत आहे. मुख्य बाब अशी कि या व्हिडिओत त्याच्या फोटोला चक्क हार घातला आहे. या गोष्टीवरून खर्च अकल बडी के भैस असा प्रश्न निर्माण होतोय.

आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील श्रीकलाहस्तीमध्ये सोनू सूदच्या फोटोला त्याच्या जिवंतपणीच लोकांनी कृतज्ञता म्हणून हार घातला आहे. हे काय कमीच होते म्हणून दुधाने भरभरून अभिषेक केला आहे. कोरोनाच्या संकट काळात तो प्रत्येक गरजूच्या मदतीला ज्या निस्वार्थ भावनेने मदत करत आहे, त्या भावनेबाबत कृतज्ञता व्यक्त करताना हा सोहळा आयोजित केला होता. तसेच लोकांसाठी देवदूत झालेला सोनू खरोखरच आपल्यासाठी देवासमान आहे असे लोकांनी सांगितले. या दुग्धाभिषेक कार्यक्रमाचे अध्यक्ष पुली श्रीकांत होते. त्यांनी या कार्यक्रमाद्वारे सोनू सूद यांना प्रेरणा म्हणून घ्यावे व इतरांना मदत करावी, असे सर्व लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

हा व्हिडीओ सध्या इतका वायरल झाला आहे कि, अगदी सोनू सूद पर्यंतही पोहोचला आहे. आतापर्यंत सोनूने केलेल्या प्रत्येक कामाचे अपडेट तो त्याच्या ट्विटर हॅण्डलवरून देत असतो. या प्रत्येक ट्विटवर त्याचे चाहते भरभरून कौतुक आणि आभार मानताना दिसत असतात. त्याने हा व्हिडिओही आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहल्यानंतर सोनुने या लोकांकडून झालेल्या चुकीबद्दल कोणताही आक्षेप घेतला नाही वा त्यांची खिल्ली उडविली नाही. याउलट त्यांच्या भावनांचा आदर करीत आभार मानले आहेत. पण सोनूच्या चाहत्यांनी मात्र यांना चांगलेच ट्रोल केलेले दिसत आहे.

Leave a Comment