उन्नाव : वृत्तसंस्था – झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक तरुण जीवघेणे स्टंट (Stunt) करत असतात. सध्या अशाच एका तरुणाच्या स्टंटचा (Stunt) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या तरुणाने आधी कपड्यांना आग लावली. त्यानंतर बाईकवर बसून त्याने तलावात उडी मारली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
तरुणाचा कपड्यांना आग लावून बाईकवरून जीवघेणा स्टंट, Video आला समोर pic.twitter.com/soxs3ZE34J
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 18, 2022
हा स्टंट (Stunt) करणाऱ्या बाईकस्वाराने आपल्या कपड्यांना आग लावली. त्यानंतर तलावात उडी घेतली. या तरुणाचा स्टंट पाहण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. युवकाचा हा स्टंट (Stunt) एवढा घातक आणि जीववर बेतणारा असू शकतो याची कोणालाही कल्पना नव्हती. या व्हायरल व्हिडीओनंतर पोलीस स्टंट करणाऱ्याचा शोध घेत आहेत.
या तरुणाचा स्टंट (Stunt) पाहून इतर कोणीही असे धाडस करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. हा थरारक व्हिडीओ उत्तर प्रदेशातील उन्नाव भागातील असल्याचे समजत आहे. पोलीस या व्हिडिओच्या आधारे स्टंट (Stunt) करणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत.
हे पण वाचा :
जनतेने एकदा ठरवले तर भले भले घरी बसवतात; अजित पवारांचं सूचक विधान
अमेरिकन बाजारातील घसरणीने मोडला 50 वर्षांचा विक्रम !!!
हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान
विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड
एकनाथ शिंदेनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा