जमिनीपासून 200 फूट उंचीवर 2 विमानांची समोरासमोर धडक, 2 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणी विमानतळावर विमान लॅण्ड करताना एक भीषण दुर्घटना घडली. यामध्ये दोन विमानांची समोरासमोर धडक (two planes crash) झाली. वॉटसनविले म्यूनिसिपल विमानतळावर गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. विमान लॅण्डिंगपूर्वी हि दुर्घटना (two planes crash) घडली. जवळपास 200 फूट उंचीवर 2 विमानं एकमेकांना (two planes crash) धडकली. या दुर्घटनेत विमानाचं मोठं नुकसान झालं. तर दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

https://twitter.com/Alerta_News_/status/1560416712645820416

हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अजून समजू शकलेले नाही. या दुर्घटनेनंतर (two planes crash) चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेनंतरचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक दुर्घटनाग्रस्त विमान (two planes crash) मैदानात पडल्याचं दिसत आहे. तर दुसरं दुर्घटनाग्रस्त विमान हे एका छोट्या इमारतीमध्ये घुसल्याचे दिसत आहे.

या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विमानतळावर लॅण्डिग आणि टेक ऑफचं मार्गदर्शन करण्यासाठी एकही कंट्रोल टॉवर उपलब्ध नाही आहे. या भागात 4 रनवे आहेत आणि इथे 300 हून अधिक विमानांचं लॅण्डिंग केलं जातं. या भीषण अपघाताची (two planes crash) माहिती मिळताच कॅलिफोर्नियाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील चौकशी सुरु केली.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?