Sunday, March 26, 2023

मद्यपींसाठी खुशखबर! 31 डिसेंबरला पब, बार, हॉटेल्स पहाटे ५ पर्यंत सुरु राहणार

- Advertisement -

टीम, HELLO महाराष्ट्र। नाताळ आणि विशेष म्हणजे ३१ डिसेंबरला हॉटेल आणि बार किती वाजेपर्यंत चालू राहणार हा दरवर्षीच कळीचा मुद्दा असतो. परंतु यंदा मात्र हा कळीचा मुद्दा ठरणार नाही. कारण २४,२५ आणि ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत बार सुरु राहणार आहेत, तर वाईन शॉप रात्री १ पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून यासंबधीचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले. त्यामुळे पार्टीचे नियोजन असणारांसाठी हि आनांदाची बातमी आहे.

इतर वेळी रात्री दीड वाजेपर्यंत सुरु राहणारी हॉटेल्स, बार आणि पब्स २४, २५ आणि ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तर वाईन शॉप्सना रात्री १ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नववर्षाचे स्वागत अनेकांना मोठ्या जल्लोषात करायच असते.  त्यामुळे आम्ही ही मुदतवाढ दिली असून, यामुळे मुंबईला एक पर्यटनस्थळ म्हणूनही चालना मिळते. या दिवशी पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा ठेवण्याची विनंती करण्यात आली असल्याचे एका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान वेळेत वाढ करण्यात आली असली, तरी बार आणि पब चालकांना अद्याप पोलिसांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. पोलिस महासंचालकांना यासंदर्भात पत्र दिल्याची माहिती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या अध्यक्षांनी दिली आहे.