महाबळेश्वर- तापोळा रस्त्यावर ब्रेक फेल झाल्याने बोलेरो गाडी 200 फूट दरीत

Mahabaleshwar-Tapola road Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
महाबळेश्वर- तापोळा रस्त्यावरील चिखली शेडजवळ बोलेरो (Bolero) गाडीचा ब्रेक फेल (Break Fell) होऊन गाडी 200 फूड खोल दरीत गेल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. चार दिवसापूर्वीच 40 मजुरांना घेवून निघालेला टेम्पोला अपघात झाल्याची घटना ताजी असताना आता बोलरो गाडी दरीत कोसळल्याची घटना घडली. या वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वाहन चालकांनी महाबळेश्वर (Mahabaleshwar) परिसरातील घाट परिसरात खबरदारी घेणे गरजेचे आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वरहून तापोळ्याकडे जाणाऱ्या बोलरो गाडीचा अपघात झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात श्रीकांत गणपपत बावळकर, विजय बजरंग मरे, सूरज यशवंत घाडगे अशी जखमीची नावे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांनाच्या मदतीने जखमींना बाहेर काढले आहे.

जखमींना महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी वाई येथे पाठविण्यात आले आहे. या मध्ये एका व्यक्तीच्या डोक्याला मार लागला असुन एकाच पाय फ्रॅक्चर झाला आहे व एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. अधिक माहिती पोलिस घेत आहेत.