कास पठारावर रानगव्यांचा वावर वाढला, प्राण्यांची संख्या वाढू लागली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्ह्यातीस जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर रानगव्यांचा वावर वाढला आहे. रानगव्याचा कळपाचा कास पठारावर मुक्तपणे संचार पहायला मिळत असल्याने स्थानिकांसह पर्यटकांच्यात भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. रानगव्याचा संख्या या परिसरात दिवसेंन दिवस वाढताना दिसत आहे. एकीकडे भीतीही पहायला मिळत असताना या पठारावर प्राण्याची संख्या वाढत असल्याने प्राणी मित्रांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसा स्थळ व आंतरराष्ट्रीय जैवविविधता म्हणून कास पठाराची ओळख आहे. कास पठारावर बिबट्या, अस्वल, रानडुक्कर, सायाळ, रानगव्यासारख्या अनेक वन्य प्राण्‍यांचा वावर असतो. रविवारी पहाटे पठारावर रानगव्यांचा कळप नागरिकांना दिसला. पाठोपाठ आणखी काही रानगवे त्याच्या मागून आले. रानगव्यांचा हा कळप बिनधास्तपणे इकडून -तिकडे फिरकत होता. भर रस्त्यावरुन काहीकाळ त्याचा संचार राहिला. त्यामुळे रस्त्यावरुन जाणारे वाहनचालक जागीच थांबत असून काळजी घेवून प्रवास करावा लागत आहे.

रानगव्यांचा हा कळप काही कालावधीनंतर दाट झाडीत निघून गेला. या पठारावरील घनदाट जंगलात रानगव्यांचे वास्तव्य असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अनेक रानगवे कळपाने भटकत असल्याचे स्थानिकांनी अनेकदा पाहिले आहे. मात्र त्यांची संख्या नक्की किती आहे हे वनविभागाने माहिती घेवून जाहीर करणे गरजेचे आहे.

Leave a Comment