पहिल्या दिवशी ५३ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा चार जिल्ह्यांत ३१६ केंद्रांवर व्यवस्था

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित पदवी अभ्यासक्र माच्या व्दितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षांना १६ मार्चपासून सुरूवात झाली. सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत सुमारे ५३ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा दिली. परंपरागत पदवी अभ्यासक्र माच्या व्दितीय तसेच तृतीय वर्षाच्या परीक्षा पहिल्या दिवशी सुरळीत पार पडल्या.
ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत ३१६ केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली. मंगळवारी सकाळच्या सत्रात व्दितीय व तृतीय वर्षाच्या १५ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, तर सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा दिली. दुपारच्या सत्रात ५५२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर सुमारे १५00 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा दिली.

ऑनलाईन व ऑफलाईन यापैकी एका पध्दतीने परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांना मुभा होती. ऑफलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याच महाविद्यालयात केंद्रे दिली आहेत. ऑनलाईन परीक्षा मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकाद्वारे विद्यार्थी कुठूनही देउ शकतो. परीक्षा केंद्रावर कोरोनाबाबतच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. विद्यापीठाने २0 अधिकारी, कर्मचाऱ्याची एक समिती स्थापन केली असून, ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यास मदत केली जात आहे. मात्रा पहिल्या दिवशी फारशा अडचणी आल्या नाहीत, असे उपकुलसचिव कलावंत यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment