कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पुणे- बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर मलकापुर शहराच्या हद्दीमध्ये आज पहाटे चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेला निघालेला ट्रक हायवेवरील लोखंडी बॅरिगेट तोडून पादचारी पुलाच्या पिलरला जावून धडकला. कराड शहराजवळ हायवेवरून पादचाऱ्यांना ये- जा करण्यासाठी असलेल्या पुलाल ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेच्या आवाजाने आजूबाजूचे रहिवाश्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिकांनी बाहेर काढले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शनिवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पादचारी पुलाला ट्रकने (MH- 04- HD- 8731) जोराची धडक दिली. ट्रकच्या धडकेने आजूबाजूला राहणारे रहिवाशी झोपेतून जागे झाले अन् त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. परंतु ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. ट्रकच्या काचा पूर्ण फुटलेल्या आहेत.
या अपघातात ट्रकचे व पादचारी पुलाचेही नुकसान झाले आहे. अपघाताची खबर मिळताच कराड शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल होऊन अपघातग्रस्त वाहनाला क्रेनच्या सहाय्याने सर्व्हिस रस्त्यावरुन हटवून वाहतुक सुरळीत केली.