सातारा शहरात मुख्य रस्त्यावर भगदाड, सर्वत्र पाणीच पाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजी मंडईच्या समोर मेन रस्त्याला मोठे भगदाड पडून रस्ता खचला आहे. रस्त्याला भगदाड पडल्याने प्रतापसिंह भाजी मंडईत पाणीच पाणी साठले होते. यामुळे प्रवाशी व भाजी मंडईतील ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

पोवाई नाका ते एसटी बसस्थानक दरम्यान असलेल्या तहसिलदार कार्यालयासमोरील रस्त्यांवर हे भगदाड पडलेले आहे. या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. अशातच भगदाड पडल्याने आणि पाणी वाहत असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली.

रस्त्यांचे ऑडिट करण्याची मागणी

भाजी मंडईच्या समोर मेन रस्त्याला मोठे भगदाड पडून संपूर्ण मंडईत पाणीच पाणी झाले. या रस्त्याचा वाली कोण आहे. पीडब्ल्यूडीने नगरपालिका सातारा शहरातील चालू असलेल्या रस्त्यांचे व पूर्वीच्या झालेल्या रस्त्यांचे ऑडिट करण्याची मागणी करणार असल्याचे आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी सांगितले.

Leave a Comment