दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस
गेली 98 वर्षापासून दिवाळी निमित्त खटाव तालुक्यातील पारगांव येथे मेंढ्या पळवण्याची पंरपरा सुरू आहे. या वर्षी ही बिरुदेव मंडळाने मेंढ्यांच्या जंगी शर्यती आयोजन केले होते. यावेळी बिरुदेव मंदिराभोवती गोल फेरी मारून खांडव्यातील बकऱ्याने व मेंढ्यांनी उंची उढी मारून नारळाचे तोरण शिवले. यावेळी विजेत्या मेंढ्यांना चांदीचे कडे व चांदीची अंगठी देवून बक्षीस देण्यात आले.
पारगांव येथे मेंढरांची अनोखी स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेत जिंकणाऱ्या कळपाला बक्षीसही देण्यात आले. या स्पर्धेची चर्चा मात्र सर्वत्र सुरू आहे. स्पर्धेत सहभागी कळपातील मेंढरांची रंगरंगोटी करून आणले होते. स्पर्धा सुरू झाल्यानंतर मेंढराचा कळप बांधलेल्या तोरणाला ज्याचा स्पर्श होईल, त्या कळपाला विजेते घोषित केले जाते.
यावेळी पारगावचे सरपंच रिंकी पवार, उपसरपंच सचिन पवार, ग्रामपंचायत सदस्य अविनाश चव्हाण, अतुल बोकडे, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिप घुटूगडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रकाश जानकर, विकास जानकर, राजवीर जानकर, दादासो जानकर यांनी केले.