होळीनिमित्त माहेश्वरी समाजाचा सामूहिक डुंडचा कार्यक्रम उत्साहात 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

परभणी/ नवनीत तापडिया – होळीच्या पवित्र सणानिमित्त जिल्ह्यातील सेलू शहरातील माहेश्वरी समाज व बालाजी मंदिर ट्रस्ट च्या वतीने आज सायंकाळी लहान मुलांचा सामुहिक डुंडचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाची विशेषतः अशी की, होलिका दहन झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना ज्या घरात लहान मुले आहेत त्या घरात भरभराट होवो आणि सुख समृद्धी नांदो त्याचप्रमाणे सर्व लहान मुलांना आशीर्वाद दिले जाते. असा हा आगळावेगळा कार्यक्रम होळीनिमित्त बालाजी मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एकूण 11 मुला-मुलींना आशीर्वाद देण्यात आला. यामध्ये नऊ मुले तर दोन मुलींचा समावेश होता. यापूर्वी मात्र, केवळ मुलांसाठी हा कार्यक्रम होत असे‌. परंतु, यावर्षीपासून मुला-मुलींमध्ये भेद न करता मुलींचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. बालाजी मंदिर ट्रस्ट नेहमीच अशा अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते.

तसेच या कार्यक्रमानिमित्त मराठवाड्यातील प्रसिद्ध नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील नामवंत नेत्रतज्ञ डॉ. एस.एम. लोया यांचा 81 व्या वाढदिवसानिमित्त बालाजी मंदिर ट्रस्ट व सर्व समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Leave a Comment