सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील वेण्णानदीच्या काठी असलेले वाढे गावचे जागृत ग्राम दैवत भैरवनाथ व वाढेश्वर जोगेश्वरी देवतांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी वाडेश्वर जोगेश्वरीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी वेण्णा नदीच्या काठी 25 फूट लांब आणि 27 इंच रुंदीचा अग्निदिव्य तयार करण्यात आला होता. त्या अग्नी दिव्यातून शेकडो नवसकरी धावले.
वाढे गावात एक अनोखी प्रथा अनेक वर्षांपासून सुरु आहे. या गावातील भैरवनाथ व जोगेश्वरी देवतांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षीही भाविकांच्या वतीने मोठ्या संख्येने यात्रेस उपस्थिती लावण्यात आली. यावेळी यात्रेनिमित्त वेण्णा नदीच्या काठी 25 फूट लांब आणि 27 इंच रुंदीचा अग्निदिव्य तयार करण्यात आला होता. त्यामधून मानकरी, सेवक, ग्रामस्थ, उपवास केलेले इतर बाहेरगावचे भाविक श्रींचा जयघोष करीत अग्निदिव्यातून चालत गेले.
साताऱ्यातील वाढेश्वर यात्रेनिमित्त अग्निदिव्यातून धावले शेकडो नवसकरी pic.twitter.com/55fYEKWh0t
— santosh gurav (@santosh29590931) April 12, 2023
यावेळी अग्निदिव्यातील प्रसंग हा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी वेण्णा नदीच्या काठी उपस्थिती लावली होती. यावर्षी जिल्हासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी वाडेश्वर आणि जोगेश्वरी विवाह सोहळ्यास उपस्थिती लावत मनोभावे दर्शन घेतले.