नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुढील हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे. जर शेतकरी दहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील तर 15 डिसेंबरला त्यांच्या खात्यात दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील. याचा अर्थ असा की, सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये पाठवेल.
त्याच वेळी, गेल्या वर्षी 25 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे ट्रान्सफर केले. आतापर्यंत, सरकारने देशातील 11.37 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 1.58 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट ट्रान्सफर केली आहे.
पैसे मिळतील की नाही ते पहा
तुम्ही पीएम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले असेल, तर तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये आहेत की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
याप्रमाणे लिस्टमध्ये नाव तपासा
1. सर्वप्रथम तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.
2. त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
3. शेतकरी कॉर्नर सेक्शनमध्ये, तुम्हाला Beneficiaries List या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4. त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाउन लिस्ट मधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
5. यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण लिस्ट दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
याप्रमाणे हप्त्याची स्थिती तपासा
वेबसाइटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला Farmers Corner वर क्लिक करा. यानंतर Beneficiaries Status पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. आता तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.
पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी तुम्ही घरबसल्या रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी तुमच्याकडे सातबारा, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि तुमच्या शेताचा बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट http://pmkisan.nic.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता.