हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ केव्हा घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबतच एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 8 जून रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान पदाची शपथ घेतील, असे वृत्त समोर आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेतील.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मंगळवारी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाचे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 17 वी लोकसभा विसर्जित करण्याची झाली. येत्या 16 जून रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर आज नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींच्या हवाली केला. आता पुन्हा एकदा येत्या
7 जून रोजी संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल.
तसेच, नरेंद्र मोदी ही पंतप्रधान पदाची शपथ घेतील.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. यात राजकीय घडामोडींचा वाढता वेग बघता नरेंद्र 8 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन सरकार स्थापन करतील, अशी दाट शक्यता आहे.