कॉलेज प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

bAMU
bAMU
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आता 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे.

‘सीईटी’ व ‘नीट’ चा निकाल उशिरा लागल्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थी महाविद्यालयांकडे फिरकलेच नव्हते. आता अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार नाही, याची खात्री झाल्यामुळे विद्यार्थी प्रवेशासाठी महाविद्यालयांकडे वळले आहेत. तथापि विद्यापीठ व महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया राबविल्या नंतरही क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झालेल्या आहेत. सर्व विभागाचे विभाग प्रमुख व बहुतांश प्राचार्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने आता 30 नोव्हेंबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वीही तीन-चार वेळेस प्रवेशाची अंतिम तारीख पुढे ढकलली आहे. परंतु अजूनही बहुतांश जागा रिक्त असल्याने विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एकदा प्रवेशाची तारीख वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.