जेसीबी मशीनच्या 70 तासांचे बिल दीड लाख, चाैकशी करावी : संतोष गिरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण | सोनाईचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता 70 तास जेसीबी मशिनचे काम दाखवून दीड लाख रूपयांचे बिल काढले आहे. या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य संतोष गिरी यांनी केली. तर पाटणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनी सायंकाळी सेवा देणे बंधनकारक आहे. पाटणमध्ये खासगी डॉक्टर रात्रीची सेवा देत नाहीत, याची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचा ठराव पंचायत समिती सभेत करण्यात आला.

सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती राजाभाऊ शेलार होते. गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उपसभापती प्रतापराव देसाई, सहायक गटविकास अधिकारी विजय विभूते उपस्थित होते. शिक्षण विभागाचा आढावा देताना, रिक्त पदांची भरती अद्याप नाही. चार शाळांना दुरुस्ती मंजूर व 11 शाळांना नव्याने बांधकामांची मंजुरी आलेली आहे, असे गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांनी सांगितले.

सोनाईचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये गटार कामासाठी 70 तास जेसीबी मशिनचे काम दाखवून बेकायदेशीरपणे दीड लाखाचे बिल काढले असल्याचे निदर्शनास पंचायत समिती सदस्य संतोष गिरी यांनी आणून दिले. यावर सभापती शेलार यांनी तक्रार पंचायत समितीकडे आली तर चौकशी करू, असे स्पष्ट केले.

Leave a Comment