दहिवडी येथील घरफोडी प्रकरणात कराडच्या एकास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस

माण तालुक्यातील किरकसाल येथील एकनाथ महादेव अवघडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून  अज्ञात इसमाने त्यांच्या घरात ठेवलेली बजाज प्लेटिना मोटरसायकल क्रमांक (एमएच-  11 एएन- 6977) ही चोरीस गेल्याने दहिवडी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरील आरोपीस 2016 सालापासून फरारी होता, त्यास पाच वर्षांनी अटक करण्यात दहिवडी पोलिसांना यश आले आहे.

गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी गाडी ही नितीन प्रकाश तुपे (रा.  आगाशिवनगर कराड ता. कराड) यांच्या कब्जात दि. 21/12/2016 दिसून आल्याने यापूर्वी अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्याच्या तपासात मारुती श्यामराव तुपे (रा. आगाशिवनगर कराड) हा निष्पन्न झाला होता. गुन्हा घडल्यापासून संशयित फरारी होता. दि.19/10/2021 रोजी दहिवडी पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी किरकसालच्या दिशेने धाव घेतली आणि  आरोपी मारुती शामराव तुपे हा किरकसाल या गावी येणार असल्याची चाहूल लागताच त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. संशयितास न्यायालयात हजर केले असता आरोपीस न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

सदरची कारवाई अजय कुमार बंसल पोलिस अधीक्षक सातारा, अजित बोऱ्हाडे अप्पर पोलीस निरीक्षक सातारा, डॉ. निलेश देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली  संतोष तासगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक, पी.जी हंगे, सहाय्यक पोलीस  फौजदार, एस एन केंगले,पो. हे कॉ. ब. न.464, आर एस बनसोडे,पो. ना.ब. न.243 पो.कॉ ब. न.1162 कदम यांनी या कारवाईस सहभाग घेतला.