कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरातील भाजी मंडईत भाजी घेत असताना दुचाकीस्वाराला चारचाकी गाडी घासल्याच्या कारणावरून एकास मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत महेश सर्जेराव पाटील (रा. मंगळवार पेठ, कराड) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सईद अल्ताफ शिकलगार (रा.भाजी मंडई कराड) असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पाटील हे रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भाजी मंडई येथे रस्त्याकडेला गाडीवर बसुन भाजी खरेदी करीत होते. यावेळी सईद अल्ताफ शेख याची चारचाकी गाडीने दुचाकीस घासले, म्हणुन महेश पाटील यांनी सईदला थोडा वेळ थांबता येत नाहीत का असे म्हटले.
यावरून सईदने तुला माहित नाही का मी कोण आहे असे म्हणुन शिवीगाळ करीत गाडीतील लाडकी दांडक्याने महेश पाटील यांना मारहाण केली. यावेळी गाडीत असलेल्या दोघांनीही भाजी विक्रेत्यांच्या वजन काटा, त्यावरील वजने व पातेल्याने मारहाण केली. अधिक तपास पोलीस हवालदार गडांकुश करीत आहेत.