Sunday, April 2, 2023

एक दिवस असा येईल ज्या दिवशी असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालीसा म्हणतील- योगी आदित्यनाथ

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. निवडणूक जिकंण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकीकडे आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत मतदारांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत तर दुसरीकडं भाजपाचे नेते केजरीवाल यांच्याविरोधात धार्मिक मुद्य्यांवरून त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वहिनीवर हनुमान चालीसाचे पठण केलं होतं. केजरीवाल यांच्या हनुमान चालीसा पठणाला धार्मिक रंग देत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

आपल्या टीकेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांसोबत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही निशाणा साधला आहे. “दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ येते आहे तसं अरविंद केजरीवाल हनुमान चालीसा गाताना दिसत आहेत. एक दिवस असा येईल ज्यादिवशी असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालीसा म्हणताना दिसतील.” असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. दिल्लीत आप विरुद्ध भाजपा असा लढा आहे. भाजपाचे दिग्गज नेते दिल्लीत प्रचारासाठी येत आहेत. याचाच एक भाग म्हणून भाजपने योगी आदित्यनाथ यांना सुद्धा दिल्ली निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

- Advertisement -