हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भाजपचे तरुण खासदार तेजस्वी सूर्या यांनी दिल्लीतील शाहीनबाग घटनेवर भाष्य केलं आहे. लोकांना आवाहन करताना खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले, “दिल्लीच्या शाहीन बाग येथे हे सध्या काय सुरु आहे. याविरोधात देशातील बहुसंख्यांक अद्याप जागरुक झालेले नाहीत. जे देशभक्त नागरिक आहेत ते ही या आंदोलनासोबत नाहीत. मात्र, बहुसंख्यांक सतर्क राहिले नाहीत तर आता दिल्लीत पुन्हा मुघल राज येणं दूर नाही.”
सुर्या यांच्या या विधानावर विरोधकांनीही तिखट प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर सुर्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रेय देताना म्हटलं की, “त्यांनी देशातील अनेक दशकांपासूनचे प्रलंबित असलेले संवेदनशील विषय सोडवण्याचे काम केले आहे. यामध्ये कलम ३७० रद्द करणे, राम मंदिराची उभारणी, बोडो बंडखोरांचा वाद आणि तिहेरी तलाक मोडीत काढणे या घटनांचा यात समावेश आहे. हे सर्व करणं आवश्यक होतं कारण, नवा भारत हा जुन्या जखमा भरल्याशिवाय तयार होऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.