सातारा- लोणंद मार्गावर ट्रकच्या धडकेत एक ठार : अपघात सीसीटीव्हीत कैद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा- लोणंद मार्गावर असलेल्या वडूथ गावच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास साबळे मॉल जवळ ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या धडकेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला आहे. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरापासून काही अतंरावर असलेल्या वडूथ हद्दीत हा अपघात झाल आहे. या अपघातात बोरखळ येथील दिलीप खाडेकर हे दुचाकीवरुन जात असताना भरधाव वेगात पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दिलीप खाडेकर हे जागीच ठार झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला आहे.  ट्रकचालक अपघात स्थळावरून फरार झाला आहे. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सातारा पोलिस करत आहेत.