काळज- सासवड रस्त्यावर दुचाकी अपघातात एक ठार तर एक जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे

फलटण तालुक्यातील काळज -सासवड रस्त्यावर तांबेवस्ती जवळ दोन दुचाकीचा समोरा समोर अपघात झाला. अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अजित हरिभाऊ पवार (वय- 42, रा. शेरेचीवाडी, ता. फलटण) असे मृत्यू झाल्याचे नांव आहे. तर सूर्यकांत गणपत भोसले (वय- 38, रा. शेरीचीवाडी, ता. फलटण) हे जखमी झालेले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शेरेचीवाडी येथील अजित हरिभाऊ पवार (वय- 42, रा. शेरेचीवाडी, ता. फलटण) व त्यांच्यासोबत असलेला सूर्यकांत गणपत भोसले (वय- 38, रा. शेरीचीवाडी, ता. फलटण) हे दोघेजण दि. 8 रोजी मोटरसायकलवरून काळज येथून शेरेचीवाडीकडे जात होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सासवड -काळज रस्त्यावर तांबे वस्ती येथे दोन्ही मोटरसायकलच्या समोरासमोर अपघात झाला.

यामध्ये अजित हरिभाऊ पवार यांचा जखमी होऊन मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेले सूर्यकांत भोसले जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर अनोळखी दुचाकीस्वाराने अपघात स्थळावरून पलायन केले. मयत अजित पवार यांचे पश्चात वडील ,भाऊ, भावजय, पत्नी ,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Leave a Comment