कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील शिरवाग येथील एका शिवारात शेतीचे काम सुरु असताना वीज पडून एक शेतकरी जागीच ठार झाला, तर दुसरा जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. रुपेश हणमंत यादव (वय ३८) असे संबंधित ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे, तर दादासाहेब थोरात हे जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी : वादळी वाऱ्यासह पावसाने मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास शिरगाव परिसरात हजेरी लावली. यावेळी दादासाहेब थोरात यांच्या शेतात रुपेश यादव व थोरात हे दोघे ऊस फोडणीचे काम करत होते. अचानक पाऊस सुरु झाल्याने विजांचा कडकडाट झाला. शेतात काम करत असताना रुपेश यादव यांच्या अंगावर वीज पडली. त्यामध्ये रुपेश यादव हे जागीच ठार झाले, तर सोबत असलेले थोरात जखमी झाले. मोठा आवाज झाल्याने जवळपास शेतात असलेल्या शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने संबंधित दोघांना उपचारासाठी उंब्रजच्या रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुपेश यांचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, रात्री येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. श्री. थोरात यांना उपचासाठी उंब्रजमधील रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांनीही मोठा धक्का बसला आहे. रुपेश यादव यांनी नुकतेच घर बांधायला काढले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. त्याच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे. या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group