बाबो !! चक्क एका हातानं मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’ ; व्हिडिओ व्हायरल

0
30
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की आपल्याला आठवतो तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी. आयपीएल असो किंवा भारतीय संघाकडून खेळायचं असो, धोनीने हेलिकॉप्टर शॉटच्या मदतीने अनेकदा उत्तुंग असे षटकार लगावले आहेत. धोनीच्या या शॉटची नक्कल करण्याचा प्रयत्न जगभरातील अनेक खेळाडू करतात. मॅक्सवेल, हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूंचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच एका हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडीओ सध्या मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी जसा हेलिकॉप्टर शॉट खेळतो, तसाच हेलिकॉप्टर शॉट फलंदाज एका हाताने मारताना दिसतं आहे.

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये फलंदाज एका हातानं ‘हेलिकॉप्टर शॉट’ मारत असल्याचं दिसत आहे. बॅकग्राउंडला समालोचक आकाश चोप्रा यांचा आवाजही आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून अनेंकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा खेळाडू नक्की कोण हे अद्याप समजलं नसलं तरी हा व्हिडीओ मात्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here