इंदूर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यातील महू येथे कावड यात्रेदरम्यान विजेच्या धक्क्याने (electric current) एका कावड यात्रीचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. यावेळी डीजेच्या तालावर नाचणार्या कावड यात्रीच्या हाताला 11 हजार किलोवॅटच्या विजेच्या तारेने (electric current) स्पर्श केल्याने वाहनात विद्युत प्रवाह (electric current) पसरला आणि वीजेचा झटका लागल्याने काही कावड यात्री वाहनावरुन खाली पडले. ही घटना आज सोमवारी सिमरोल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे.
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था pic.twitter.com/g0aB3VAAq1
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 8, 2022
काय आहे संपूर्ण घटना
हा अपघात दुपारी एकच्या सुमारास झाला. त्या वेळी कावड यात्री नृत्य करत होते. विद्युत प्रवाह (electric current) पसरल्यावर तरुणांची पडझड सुरू झाली. यात रौनक या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर शिवा, लोकेश आणि अतुल हे तरुण जखमी झाले. शिव याची हालत गंभीर असल्याने त्याला इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. तर लोकेश आणि अतुल यांच्यावर महू येथे उपचार सुरू आहेत.
हा अपघात होण्यापूर्वी सिमरोलच्या मेंमदी गावात रविवारी रात्री सर्व कावड यात्री एक दिवस तलावाजवळ थांबले होते. यानंतर ही कावड यात्रा ओंकारेश्वर ते सिमरोल परिसरातील बगोडा या गावाकडे पाणी घेऊन निघाली होती. कावड यात्रेचे हे यंदाचे चौथे वर्ष आहे. मागच्या आठवड्यातदेखील पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये सोमवारी पिकअपला विजेचा धक्का (electric current) लागून 10 कावडियांचा मृत्यू झाला होता तर 16 जण गंभीररीत्या भाजले होते. मेखलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरला पुलावर हा अपघात झाला होता.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर