Asia Cup 2022 साठी भारतीय संघ जाहीर; कोणाचे पुनरागमन तर कोणाला डच्चू ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – येत्या 27 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया चषकासाठी (Asia Cup 2022) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी (Asia Cup 2022) 15 जणांना संघात स्थान दिले आहे. या संघात (Asia Cup 2022) विराट कोहली आणि लोकेश राहुलचं पुनरागमन झालं आहे तर श्रेयस अय्यरला या संघातून वगळण्यात आले आहे. हर्षल पटेल व जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघातून बाहेर गेले आहेत. याबरोबर संजू सॅमसन आणि इशान किशनलाही संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

विराट-राहुलचं कमबॅक
इंग्लंड दौऱ्यानंतर विश्रांती घेतलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे संघात (Asia Cup 2022) पुनरागमन झाले आहे. विराटसह दुखापतीमुळे संघातून बाहेर असलेल्या लोकेश राहुलचेसुद्धा संघात पुनरागमन झाले आहे. या संघात श्रेयस अय्यरला डच्चू दिल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या सामन्यात भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाच्या बाहेर गेला असल्यामुळे संघाला मोठा धक्का बसला आहे.

आशिया चषकासाठीचा भारतीय संघ (Asia Cup 2022)
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक (विकेट कीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात

Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण

सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर

भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…