हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पृथ्वीच्या विनाशाबाबत आजवर अनेक भाकीत सांगण्यात आली आहेत. परंतु आता थेट NASA च्या संशोधकांनीच पृथ्वीच्या विनाशासंदर्भात मोठे संकेत दिले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (international Space Station) अवकाशात तरंगत आहे. परंतु हे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळले तर सर्वात मोठा विनाश होईल, असा खुलासा NASA च्या संशोधकांनी केला आहे.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. जगभरातील एकूण 15 देशांनी एकत्र येऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची स्थापन केली आहे. मात्र आता NASA ने हे स्पेस स्टेशन नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतराळातील हे स्पेस स्टेशन एका स्पेसक्राफ्टच्या मदतीने डिऑर्बीट म्हणजेच नष्ट करण्यात येईल. मात्र या प्रक्रियेत सर्वात मोठा धोका पत्करावा लागेल. जर स्पेस स्टेशन नष्ट करत्यावेळी किंचितही चूक झाली तर ते थेट पृथ्वीवर येऊन कोसळेल. यामुळे पृथ्वीचा विनाश होईल.
गेल्या 24 वर्षांपासून अंतराळातील स्पेस स्टेशन आपल्या कक्षेत कार्यरत आहे. परंतु या स्पेस स्टेशनचा कार्यकाळ फक्त 15 वर्षांचा होता. अशा स्थितीत स्पेस स्टेशन नियंत्रणाच्या बाहेर देखील जाऊ शकते. तसे झाल्यास त्याचा मोठा धोका निर्माण होईल. या कारणामुळेच स्पेस स्टेशन डिऑर्बीट करणे गरजेचं आहे. परंतु हे स्टेशन नष्ट करताना जर नासाकडून कोणतीही चूक झाली तर थेट पृथ्वीचा विनाश होऊ शकतो. दरम्यान, स्पेस स्टेशन नष्ट करण्यासाठी स्पेसक्राफ्ट तयार केले जाणार आहे. US Deorbit Vehicle असे या स्पेसक्राफ्ट चे नाव असेल. या स्पेसक्राफ्टवर स्टेशन नष्ट करण्याची जबाबदारी असेल. यासाठी विशेष बजेटची तरतूद करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, हे स्पेस स्टेशन दक्षिण प्रशांत महासागरात नष्ट करण्यात येईल.