One Nation One Rate Policy: सोने होणार स्वस्त?? सरकार आणतय नवी पॉलिसी

0
1
One Nation One Rate Policy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । One Nation One Rate Policy – देशभरात सध्या ‘वन नेशन, वन रेट’ (One Nation One Rate Policy) धोरणावर मोठयाप्रमाणात चर्चा रंगली आहे. या धोरणानुसार, लवकरच संपूर्ण देशभरात सोन्याचा एकच दर लागू होईल, जो प्रत्येक राज्यात सारखाच असेल. सध्या सोन्याचे दर शहरानुसार आणि राज्यानुसार वेगवेगळे असतात, पण या नव्या धोरणामुळे एकसारखे दर लागू होण्याची शक्यता आहे. आता देशभरातील सोन्याचे दर विविध कारणांमुळे वेगवेगळे आहेत . यात राज्यांतील कर, स्थानिक बाजारपेठा आणि इतर घटकांचा समावेश होतो. ‘वन नेशन, वन रेट’ धोरणामुळे सोन्याचे व्यापारी आणि ज्वेलर्स यांना खरेदी-विक्री करण्यास सोपे होईल, कारण प्रत्येक ठिकाणी समान दर असेल. तर चला या पॉलिसीबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

‘वन नेशन, वन रेट’ पॉलिसी (One Nation One Rate Policy) –

केंद्र सरकारने प्रस्तावित केलेली ‘वन नेशन, वन रेट’ पॉलिसी संपूर्ण देशातील सोन्याच्या किमती समान ठेवण्याचा उद्देश आहे. या धोरणामुळे तुम्ही दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा कोलकाता सारख्या मेट्रो शहरांमध्ये असाल किंवा लहान शहरात, सोन्याचा दर सर्वत्र समान असेल. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकार नॅशनल बुलियन एक्सचेंज तयार करू शकते, ज्याद्वारे सोन्याच्या किमती ठरवल्या जातील.

सोन्याचे दर कसे ठरतात –

सध्या, सोन्याचे दर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) च्या आधारावर ठरवले जातात. या किमती मागणी, पुरवठा, जागतिक बाजारपेठेतील स्थिती आणि महागाई यावर आधारित असतात. प्रत्येक शहरातील सराफा असोसिएशनचे व्यापारी बाजार उघडताना एकत्रितपणे सोन्याचे दर ठरवतात, त्यामुळे दरांत काही फरक दिसून येतो. पण वन नेशन, वन रेट’ (One Nation One Rate Policy) पॉलिसीमुळे होणारे फायदे अनेक आहेत. या धोरणामुळे बाजारात पारदर्शकता वाढेल, कारण सोन्याचे दर केंद्र सरकारकडून ठरवले जातील आणि ज्वेलर्सला त्यांच्या मर्जीने दर वाढवण्याची किंवा कमी करण्याची मुभा नसेल. याचाच परिमाण म्हणजे विविध शहरांमध्ये सोन्याचे दर समान होतील, ज्यामुळे ग्राहकांना संपूर्ण देशात समान किंमत मोजावी लागेल.

ग्राहकांना फायदाच फायदा –

वन नेशन, वन रेट’ (One Nation One Rate Policy) धोरण लागू झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत लक्षणीय बदल होऊ शकतात. ज्या शहरांमध्ये सोनं महाग आहे, तिथे दर कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांना फायदाच होईल. तर इतर ठिकाणी दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्याचे व्यापारी आणि ज्वेलर्स यांना एकसारख्या दरावर व्यवहार करावा लागेल.

सध्याच्या दरात बदल होण्याची शक्यता –

सध्याच्या परिस्थितीत, 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 74,000 रुपये प्रति 10 ग्राम आहे. ‘वन नेशन, वन रेट’ पॉलिसी लागू झाल्यास, या दरात बदल होण्याची शक्यता आहे, आणि एकसारखा दर सर्वत्र लागू होईल.

हे पण वाचा : अबुधाबी सर्वात सुरक्षित शहर; मुंबईचा नंबर कितवा?

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरु