‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा पायलट प्रोजेक्ट चार राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गुजरात या राज्यांमध्ये रेशन कार्डाच्या पोर्टेबिलिटीची सुविधा देण्यात आली होती. रामविलास पासवान यांनी या योजनेचं ऑनलाइन उद्घाटनदेखील केलं होतं. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्याची खात्री पटल्यानेच या निर्णयाची अमंलबजावणी संपूर्ण भारतभर करण्याचा निर्णय केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणार असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे.

या योजनेमुळे रेशन कार्ड धारक देशभरातील कोणत्याही रेशनच्या दुकानांमधून स्वस्त दरांमध्ये धान्य खरेदी करू शकणार आहे. या योजनेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या कामगारांनाही अनुदानित धान्यापासून वंचित राहावं लागणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा- 

‘तुकडे-तुकडे गँग’ आम्हाला माहितीचं नाही; आरटीआय अर्जाला गृहमंत्रालयाचे उत्तर

प्रेमवीर पोलीस कर्मचार्‍याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

कर्जमुक्ती योजनेसंदर्भात शंका असल्यास मंत्रालयातील या नंबरवर संपर्क साधा