हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मोदी सरकारने नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना आणलेल्या आहेत. त्याचा फायदा अनेक नागरिकांना झालेला देखील आहे. अशातच आता मोदींनी एक नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे नाव वन नेशन वन सबस्क्रीप्शन असे आहे. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळातून मंजुरी देखील मिळालेली आहे. आणि या योजनेवर जवळपास 6 हजार कोटी रुपये खर्च देखील करण्यात येणार आहे. या योजनेचा खास फायदा हा विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच देशातील जवळपास 1.8 कोटी विद्यार्थी शिक्षक, शास्त्रज्ञ आणि संशोधकांना या योजनेचा लाभ होणार आहे.
काय आहे वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना
सरकारची ही वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना देशभरातील सर्व विद्यापीठांना जोडणार आहे. यामध्ये सर्व विद्यापीठे त्यांची संशोधन यांनी जर्नल देखील शेअर करणार आहेत. या योजनेमध्ये प्रमुख तीन आंतरराष्ट्रीय जनरल प्रशासकांचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये राज्य सरकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये उत्तीर्ण घेणाऱ्या विद्यार्थी संशोधक आणि शिक्षकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञांनी लिहिलेले जर्नल मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना कसा कायदा होणार?
सरकारच्या यावर वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेमुळे विद्यार्थ्यांना अगदी सहजपणे आंतरराष्ट्रीय जर्नल प्रकाशकांचे संशोधन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेख वाचता येणार आहे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जे विद्यार्थी तसेच शिक्षक उच्च शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशित 13000 पेक्षा अधिक ई जर्नल 6 हजार 300 पेक्षा अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचवणार आहे.