पोतले येथे एकास लाकडी दांडके, गजाने मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 

कराड तालुक्यातील पोतले येथे दोघांनी एकास लाकडी दांडके व गजाने मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. याबाबतची फिर्याद अमोल उत्तम काळभोर (वय 36, रा. पोतले, ता. कराड) याने कराड ग्रामीण पोलिसात दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धनाजी भाऊ पवार, संदेश धनाजी पवार अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोतले (ता. कराड) येथे बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अमोल काळभोर हा त्याचे मामा राजेंद्र काळे यांचे घरासमोर असलेल्या शेतात वैरण आणणेकरीता गेला होता. त्यावेळी तो उसाचे वाडे गोळा करीत असताना पाठीमागून धनाजी पवार याने येऊन अमोलला पकडले. त्यावेळी संदेश पवार याने त्याचे हातात असलेल्या गजाने डोक्यात मारून जखमी केले. तसेच धनाजी पवार याने त्याचे हातात असलेल्या लाकडी दांडक्याने मारहाण केली.

याबाबत अमोल काळभोर याने ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास कराड तालुका पोलिस कर्मचारी करत आहेत. 

You might also like