Wednesday, June 7, 2023

एक तरुण अन त्या दोघी.. इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? डोंगरात चाॅकलेट्स, पुष्पगुच्छ अन् हार सापडले

सांगली | सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीतील शेख फरद्दीन बाबा (शेकोबा) डोंगरावर तिघांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्‍याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये एक युवक तर दोन युवतींचा सामवेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिघांच्या मृतदेहाजवळ चाॅकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडले आहेत.

आत्महत्या केलेल्यांमध्ये हरीश हणमंत जमदाडे (वय २१ रा, मणेराजुरी ), युवती (मूळ गाव जयगव्हाण ता, कवठेमहांकाळ सध्या रा. मणेराजुरी) तर एका युवतीचा समावेश आहे. त्यातील एका युवतीची अद्याप ओळख पटली नाही. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. बुधवारी रात्री या तिघांनी विषारी द्रव्य प्राशन केले असावे.

घटनास्थळी द्राक्ष बागेसाठी लागणारी विषारी द्रव्य असणारी बाटली सापडली आहे. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. प्रेम प्रकरणातून या तिघांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.