OnePlus 10T : OnePlusने लॉन्च केला दमदार मोबाइल; फक्त 19 मिनीटांत होणार फुल्ल चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने (OnePlus 10T) भारतासह जागतिक बाजारपेठेत आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 10T लॉन्च केला आहे. हा ब्रँडचा सर्वात शक्तिशाली हँडसेट आहे. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि यातील खास फीचर्स..

6.7-इंच डिस्प्ले- 

या मोबाईल मध्ये (OnePlus 10T) 6.7-इंच फुल HD+ रिझोल्यूशन LTPO2 10-बिट AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. मोबाईल स्क्रीनच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येतो. या हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधाही आहे.

OnePlus 10T

 50MP कॅमेरा-

मोबाईल च्या कॅमेरा बाबत बोलायचं झाल्यास, हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्याचा मुख्य कॅमेरा 50MP आहे. 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. याशिवाय सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे .

OnePlus 10T

4800mAh बॅटरी- (OnePlus 10T) 

वनप्लस हा मोबाइल 16GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज पर्यंत उपलब्ध आहेत. डिव्हाइसमध्ये 4800mAh बॅटरी आहे, जी 150W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा स्मार्टफोन फक्त 19 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल.

OnePlus 10T

किंमत-

भारतात वनप्लस 10T ची किंमत 49,999 रुपयांपासून सुरू होते. मोबाईलच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हर्जनची किंमत 49,999 रुपये आहे. तसेच 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हर्जनची किंमत 54,999 रुपये आहे. याशिवाय, 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये आहे.

8GB/128GB आणि 12GB/256GB OnePlus 10T मॉडेल OnePlus.in, OnePlus Store अॅप, Amazon, OnePlus एक्सक्लूसिव स्टोअर्स आणि पार्टनर आउटलेटवर उपलब्ध असेल. मोबाईलची प्री-ऑर्डर 3 ऑगस्ट रोजी रात्री 9 पासून सुरू होतील आणि 6 ऑगस्टपासून विक्री सुरू होईल. आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय बँक कार्ड वापरून फोन खरेदी करणार्‍या वापरकर्त्यांना 5,000 रुपयांची झटपट सूटही मिळत आहे.

हे पण वाचा : 

Asus ROG Phone 6 Pro : 18 GB RAM चा Asus चा दमदार मोबाईल लॉंच; पहा किंमत आणि सर्वकाही

Nothing Phone 1 : Nothing ब्रँड चा पहिला स्मार्टफोन घालणार धुमाकूळ; पहा फिचर्स आणि किंमत

Google Pixel 6a : भारतात लॉंच झाला गुगल Pixel 6a; किंमत आणि फीचर्स बद्दल जाणून घ्या

iQOO 10 Pro : फक्त 12 मिनिटांत चार्जिंग फुल्ल; iQOO चा नवा स्मार्टफोन बाजारात छाप पाडणार