हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतीय बाजारामध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हा कांदा घेण्यासाठी परवडत नाही. आता याच कांद्याच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता आता अफगाणिस्तानमधून पंजाबमधील अमृतसर आणि जालींदर या शहरांमध्ये 11 ट्रक कांदा दाखल होणार आहे. सध्या कांद्याने भरलेले 45 ते 50 ट्रक हे बॉर्डरवर उभे आहेत. आणि येत्या दोन ते तीन दिवसात हे ट्रक भारतात येणार आहे. परंतु आता अफगाणिस्तानचा कांदा हा भारतात येणार आहे. त्यामुळे देशभरातील कांदा उत्पादकांमध्ये मोठ्या प्रमाणात संपाची दिसत आहे
भारतातील कांद्याचे बाजार भाव हे नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून 5 लाख टन कांदा खरेदी करण्यात आला होता. त्यातील कांदा हा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, भुवनेश्वर या देशांमध्ये 30 ते 35 रुपये किलो प्रमाणे विक्री सुरू करण्यात आलेली आहे. परंतु भारतात कांद्याचे दर नियंत्रणात येत नसल्याने आता परदेशातून गांधी आयात करण्याचा केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे पंजाबमधील अमृतसर आणि जालिंदर या शहरांमध्ये 300 टनहून जास्त कांदा दाखल झालेला आहे आणि आणखीन कांदा दाखल होणार आहे. यासाठी भारतीय सीमेवर काही ट्रक देखील उभे राहिलेले आहे. परंतु याबाबत खांदा उत्पादकांचा मोठा संताप निर्माण झालेला आहे.
यावर निवृत्ती न्याहरकर अध्यक्ष शेतकरी व बचत गट कांदा उत्पादक असे म्हणाले की, “दोन रुपये मिळतील या उद्देशाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काढलेला हा कांदा आता चाळीत साठविला आहे. ढगाळ वातावरण आहे तसेच पावसामुळे मोठ्या प्रमाणात साठवलेला कांदा खराब होत आहे. यामुळे कांद्याचे उत्पादनाचा खर्च हा 20 ते 30 रुपयांपर्यंत गेला. आज रोजी कुठेतरी पाच ते दहा रुपये किलो शेतकऱ्यांना नफा मिळत असताना, परदेशातून कांदा आयात करणे हे योग्य नाही. याचे परिणाम लोकसभेप्रमाणे विधानसभेतही कांदा उत्पादक शेतकरी दाखवल्याशिवाय राहणार नाही.” अशा प्रकारे संताप भारतातील कांदा उत्पादक संघटना करत आहेत.
त्याचप्रमाणे कांदा निर्यातदार प्रवीण कदम म्हणाले की, “काही दिवसापूर्वी नाफेडच्या माध्यमातून नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा हा बाजारात दाखल झालेला आहे. त्यामुळे आता थोड्याफार प्रमाणात बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न होता. परंतु आता केंद्र सरकारने 24 सप्टेंबर रोजी आपला कांदा असताना देखील दोन ट्रक कांदा अफगाणिस्ताना मधून पंजाबमध्ये जालिंदर येथे आयात केलेला आहे. आपला कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.”