कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत तब्बल ११ हजार शेतकरी; सातबारावर नोंद नसल्याने अडचण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । अवकाळी पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हाता तोंडाशी आलेले पीक गेल्याने त्यांचे कंबरडे मोडले. याचा परिणाम म्हणून आवक नसल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा राहिला त्यांना उच्चांकी भाव मिळाला. मात्र असंख्य शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. मात्र मागील वर्षी कांद्याचे उत्पादन चांगले आले होते.

यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. यामुळे तत्कालीन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबर २०१८ ते फेब्रुवारी १९ या कालावधीत विक्री झालेला कांदा अनुदानासाठी पात्र ठरला होता. मात्र सातबारा उताऱ्यावर कांदा लागवडीची नोंदच नसल्याने सोलापूरसह आठ जिल्ह्यातील ११ हजार २७९ शेतकऱ्यांना ९ कोटी, ५१ लाख, ३२ हजार ४७२ रुपये इतके अनुदान नाकारल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

दरम्यान ज्या शेतकºयांनीे कांदा विक्री केला त्यांच्या नावे असलेल्या सातबारावर कांदा लागवडीची नोंद असलेले प्रस्ताव बाजार समित्यांनी स्वीकारले होते. अनेक शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला मात्र सातबारावर कांदा लागवडीची नोंद नव्हती. त्यामुळे आता त्यांना अनुदान मिळण्यात मोठी निर्माण होत आहे. यामुळे मागच्या वर्षी सुलतानी आणि यावर्षी आस्मानी संकटात सापडलो अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

Leave a Comment