पुणे : आता पूर्वीप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला वारंवार आरटीओ ऑफिसचे खेटे मारावे लागणार नाहीत. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी आणि त्याच्या रिन्यूअलसाठी नवीन मार्गदर्शक सूचना आणली आहेत.आता अर्ज करण्यापासून लायसन्सच्या प्रिंटिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असेल. तसेच मेडिकल सर्टिफिकेट, लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स सरेंडर आणि त्याच्या रिन्यूअलसाठी इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट्स वापरली जाऊ शकतात.
रिन्यूअल आता 60 दिवस अगोदर करता येईल
नोंदणी प्रमाणपत्र ( RC ) रिन्यूअल आता 60 दिवस अगोदर करता येईल, याशिवाय तात्पुरती नोंदणी करण्याची मुदतदेखील 1 महिन्यावरून 6 महिने करण्यात आली आहे. त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने ‘लर्निंग लायसन्स’ प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. त्यानुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला आरटीओकडे जाण्याची गरज भासणार नाही, हे काम ट्यूटोरियलच्या माध्यमातून घरी ऑनलाईन करता येईल. हे पाऊल कोरोना साथीच्या काळात मोठा दिलासा देणार आहे.
मार्चच्या अखेरीस, वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स ( DL), नोंदणी प्रमाणपत्र ( RC ), फिटनेस प्रमाणपत्र, परमिट इत्यादी मोटार वाहन कागदपत्रांची वैधता 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे. मंत्रालयाने एक परिपत्रक काढले आहे की संपूर्ण देशातील कोरोनाची परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात घेऊन 1 फेब्रुवारी 2020 रोजी कालबाह्य झालेली ही कागदपत्रे येत्या 30 जून 2021 पर्यंत वैध मानली जातील.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page