डब्बू अंकलसोबत झाला ऑनलाईन फ्रॉड, फसवणूक करणाऱ्यांनी त्यांचे पैसे कसे काढून घेतले ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विदिशा । बॉलिवूड अभिनेता गोविंदासारखा डान्स करून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झालेले डब्बू अंकल (संजीव श्रीवास्तव) यांची मोठी फसवणूक झाली आहे. संजीव ऑनलाईन फसवणुकीला बळी ठरले. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्या खात्यातून एक लाख 8 हजार रुपये लुटले आहेत. याबाबत संजीवने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवले आहे. आता या प्रकरणाची पुढील तपासणी सुरू आहे.

संजीव श्रीवास्तव यांनी पोलिसांना सांगितले की,” ते आजकाल सर्व कामं ऑनलाईनच करत आहेत. ही घटना 5 ऑगस्टची आहे. त्या दिवशी जेव्हा ते ऑनलाईन ट्रान्सझॅक्शन करत होते, तेव्हा App मध्ये काही प्रॉब्लेम आला आणि ट्रान्सझॅक्शन फेल झाला. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन कस्टमर केअर नंबर शोधला आणि त्यांना 180041204980 हा नंबर मिळाला.

नंतर पैसे कट केले गेले
त्यांनी या नंबरवर फोन केला. समोरच्या व्यक्तीने त्याच्याकडून संजीवकडून त्यांच्या खात्याची माहिती घेतली. तो जे काही सांगत होता संजीव ते सर्वकाही करत गेले. काही वेळाने कॉल आपोआप डिस्कनेक्ट झाला. नंतर पैसे कट झाल्याचे मेसेजेस त्यांना येऊ लागले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आरोपीने त्यांचा मोबाईलच हॅक केला होता. यानंतर त्यांनी आपल्या मोबाईलचे सिम काढून ठेवले.

हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवले
यानंतर संजीव श्रीवास्तव थेट ASP संजय साहू यांच्यापर्यंत पोहोचले. ASP ने हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवले. त्यांच्या मते, तपासानंतर गुन्हा दाखल केला जाईल. उल्लेखनीय आहे की, डब्बू अंकल गोविंदासारखा डान्स करून संपूर्ण यूट्यूबवर प्रसिद्ध झाले. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही आहेत. ते अगदी गोविंदाच्या स्टाईलमध्ये डान्स करतात.

Leave a Comment