व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सातारा जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी 30 व 31 मे रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा

सातारा | जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यामार्फत 30 व 31 मे 2022 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त बरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in महास्वयंम वेबपोर्टलवर उपलब्ध रिक्त पदांना ऑनलाईन ॲप्लाय करावे. उद्योजकांकडून उमेदवारांच्या मुलाखती टेलिफोन अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा कार्यालयाशी दूरध्वनी क्र. 02162-239938, अथवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.