२० एप्रिल पासून उघडणार ऑनलाइन मार्केट; मोबाइल, TV सह या वस्तूंची खरेदी सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या ई-कॉमर्स कंपन्यांमार्फत मोबाईल फोन, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, लॅपटॉप आणि स्वच्छता संबंधित उत्पादनांच्या विक्रीस २० एप्रिलपासून परवानगी देण्यात येणार आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. गृहसचिव अजय भाल्ला यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यासंबंधी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनंतर एक दिवसानंतर गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हे स्पष्टीकरण दिले आहे.

डिलिव्हरी वाहनांना मान्यता द्यावी लागेल
२० एप्रिलपासून ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर मोबाइल फोन, टीव्ही, लॅपटॉपसारखे इलेक्ट्रॉनिक उत्पादने उपलब्ध होतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले. तथापि, या वस्तूंच्या डिलिव्हरीला रस्त्यावर धावण्यासाठी संबंधित प्राधिकरणाने मान्यता द्यावी लागेल. बुधवारी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार बंदच्या दुसऱ्या टप्प्यात व्यावसायिक आणि खासगी आस्थापनांना कामकाज करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, “ई-कॉमर्स कंपन्यांच्या वाहनांना आवश्यक मान्यता घेऊन रस्त्यावर जाण्याची परवानगी देण्यात येईल.”

या सेक्टरशी संबंधित लोकांना मदत मिळेल
सरकारच्या या निर्णयाला औद्योगिक व व्यावसायिक उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. ई-कॉमर्स कंपन्यांच्या लॉजिस्टिक्स आणि वस्तूंच्या पुरवठ्यात मोठ्या संख्येने लोक गुंतले आहेत. ही क्षेत्रे खुली करून सरकारला कर्मचार्‍यांच्या मोठ्या वर्गाच्या हिताचे रक्षण करायचे आहे.

“जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीशी संबंधित सर्व सुविधा चालवण्यास परवानगी देण्यात यावी,” असे या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे. स्थानिक, ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून या वस्तूंच्या मॅन्युफॅक्चरिंग, घाऊक किंवा किरकोळ व्यवसायात ते गुंतलेले असोत…. ”सोशल डिस्टंसिंग पाळत त्यांना काटेकोरपणे काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

50+ Breathtaking Online Shopping Statistics You Never Knew

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment