Ram Mandir Ayodhya | एकीकडे आज अयोध्येत राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडत आहे. तर दुसरीकडे याच राम मंदिराच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. अयोध्येत बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्री करण्यात आल्यामुळे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉनला नोटीस पाठवली आहे. ॲमेझॉन (Amazon) या ऑनलाइन शॉपिंग अँपवर राम मंदिराच्या नावाखाली बनावट मिठाई विक्री होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच ॲमेझॉनला ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
उद्घाटन सोहळ्यानिमित्त जल्लोषाचे वातावरण- Ram Mandir Ayodhya
सध्या आयोध्येमध्ये (Ayodhya) राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त (Ram Mandir Ayodhya) जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. अशा वातावरणामध्येच काहीजण आपला धंदा करण्यासाठी राम भक्तांकडून पैसे उगाळून घेत आहेत. तसेच, “श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद” अशा नावाने अमेझॉनवर प्रसादाची विक्री करण्यात येत आहे. हा प्रसाद अनेक राम भक्तांनी खरेदी केली आहे. मात्र अशा कोणत्याही प्रकारचा प्रसाद मंदिराच्या वतीने ऑनलाईन विक्रीसाठी अद्याप आलेला नाही. त्यामुळेच याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ॲमेझॉनला नोटीस पाठवली आहे.
मुख्य म्हणजे, राम मंदिराच्या (Ram Mandir) नावाखाली बनावट प्रसादाचे विक्री होत असल्याची तक्रार व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावरच ही कारवाई करण्यात येत आहे. ॲमेझॉनला (Amazon) पाठवण्यात आलेल्या नोटीशीमध्ये प्राधिकरणाने ॲमेझॉनला या सर्व प्रकरणी सात दिवसाच्या आत उत्तर मागितले आहे. ॲमेझॉनने हे उत्तर दिले नाही तर, ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे ॲमेझॉनला (Amazon) याचा मोठा फटका बसू शकतो.
दरम्यान, मुख्य आयुक्त रोहित कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली Amazon Seller Services Pvt Ltd विरोधामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या अहवालामध्येच ॲमेझॉनवर बनावट श्री राम मंदिर (Ram Mandir) अयोध्या प्रसाद विकला जात असल्याचे म्हटले गेले आहे. या सर्व प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत ॲमेझॉन विरोधात कारवाई करण्यात आली आहे.