Online Shopping : आजकालच्या तंत्रज्ञानाचा जगात ऑनलाईन शॉपिंगचे फॅड चांगलंच वाढलं आहे. बदलत्या काळानुसार, दुकानात जाऊन वस्तू खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने नवनवीन वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. सामान्यतः लोकांना असे वाटते की महिलांना ऑनलाइन शॉपिंग अधिक आवडते, याबाबतचे अनेक मिम्स आणि जोक्स सुद्धा आपण बघितले असतील. परंतु असं काहीही नाही. कारण एका सर्वेक्षणात असं समोर आलं आहे कि महिला नव्हे तर पुरुषांनाच ऑनलाईन शॉपिंगचा नाद जास्त आहे. महिलांपेक्षा पुरुष 36% अधिक ऑनलाइन खरेदी करतात. तुम्हाला हे कदाचित पटणार नाही परंतु हे खरं आहे.
आयआयएम-अहमदाबादने केलेल्या एका सर्वेक्षणात 25 राज्यांतील 35,000 लोकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी असं आढळून आलं कि, पुरुष 2,484 रुपये ऑनलाईन खरेदीवर खर्च करतात तर दुसरीकडे त्यातुलनेत महिला मात्र 1,830 रुपयेच खर्च करत आहेत. याचाच अर्थ महिलांपेक्षा पुरुष वर्ग 36%जास्ती खर्च ऑनलाईन शॉपिंगच्या (Online Shopping) माध्यमातून करतात. आयआयएमएच्या सेंटर फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन (सीडीटी) द्वारे ‘डिजिटल रिटेल चॅनल्स अॅन्ड कंज्युमर्स इंडियन पर्सपेक्टिव’ हा अहवाल रविवारी प्रसिद्ध करण्यात आला.
महिला कपड्यांवर जास्त खर्च करतात-
महिलावर्ग नवनवीन कपडे खरेदी कर्णयवर जास्त पैसे खर्च करतात. एका अहवालानुसार 47% पुरुष आणि 58% स्त्रिया ऑनलाइन कपडे खरेदी करतात, तर 23% पुरुष आणि 16% महिला इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करतात. अहवालानुसार, मोठ्या शहरांतील लोकांच्या तुलनेत छोट्या शहरातील लोक ऑनलाईन शॉपिंगकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. त्यातही फॅशन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीवर अधिक खर्च केला जात आहे.
कोरोनापासून ऑनलाईन खरेदीमध्ये वाढ – Online Shopping
ऑनलाईन शॉपिंगकडे लोकांचा जो कल वाढत आहे त्यामागील जी काही कारणे त्यातील पहिले कारण म्हणजे वस्तूंवर देण्यात येणारी सूट आणि ऑफर आणि दुसरं कारण म्हणजे कोरोना महामारीमुळे जिथे सर्वकाही ठप्प होत, त्यापासून ग्राहक ऑनलाईन शॉपिंगला आपलं प्राधान्य देत आहे.