एसबीआयने कोट्यावधी ग्राहकांना भेट देत व्याज दरात केली कपात, आता तुमचा EMI होईल कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा देताना आपल्या लोनवरील व्याज दरात कपात करण्याचा नुकताच निर्णय घेतलेला आहे. बँकेने आता आपल्या छोट्या कालावधीतील एमसीएलआरचा दर (एमसीएलआर) हा 0.05 टक्क्यांवरून 0.10 टक्क्यां पर्यंत आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. या नंतर एसबीआयचा दर घसरून 6.65 टक्क्यांच्या खाली आलेला आहे. एसबीआयने यावेळी असा दावा केला आहे की, सध्याच्या काळात त्यांचा एमएसएलआरचा दर हा देशातील सर्वात कमी दर आहेत. सदर नवीन दर हा 10 जुलै पासून लागू होईल. जूनमध्ये देखील एसबीआयने आपल्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतलेला होता. 10 जूनला एसबीआयच्या एमसीएलआरचा दर हा 0.25 टक्क्यांनी कमी होऊन 7 टक्के इतका झाला. त्यानंतर आरबीआयने 22 मे रोजी आपल्या रेपो रेट हा 0.40 टक्क्यांनी कमी करून 4 टक्के केलेला होता. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया आणि युको बँकांनीही आधीच आपल्या रेपो दरात तसेच एमसीएलआरच्या दरात कपात केली होती.

1 जुलै पासून स्वस्त झाले रेपो लिंक्ड लेंडिंग रेट आधारित लोन
एसबीआयने आपल्या एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड लेंडिंग रेट (ईबीआर) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) च्या दरातही कपात केलेली आहे. या दोन्ही दरांमध्ये जुलैपासून 0.40 टक्के कमी झाले आहे. यानंतर वार्षिक इबीआर हा 7.05 टक्क्यांवरून खाली घसरून 6.65 टक्के इतका झाला. अशा प्रकारे आरएलआर हा 6.65 टक्क्यांवरून 6.25 टक्के खाली आला आहे. 30 वर्षासाठी 25 लाखांच्या लोनवर एमसीएलआर अंतर्गत मासिक हफ्ता हा 421 रुपयांनी घसरला आहे. अशाप्रकारे ईबीआर आणि आरएलआरआर अंतर्गत मासिक हफ्ता हा 660 रुपयांनी खाली येईल.

काय आहे एमसीएलआर
एमएसएलआर हा तो दर आहे जो खाली आला तर बँक आपल्याला लोन देत नाही. हे स्पष्ट आहे की, आता हे दर कमी झाल्यामुळे बँक लोन देण्यास सक्षम होईल. आता हाऊसिंग लोन पासून इतरही लोन आपल्याला कमी व्याज दरात मिळू शकतील. परंतु याचा फायदा हा नवीन ग्राहकांसह फक्त त्या ग्राहकांना होईल ज्यांनी एप्रिल 2016 नंतर लोन घेतलेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment