फक्त ‘हे’ ३ कागदपत्र जमा केल्यावर घरी परतलेल्या कामगारांच्या खात्यावर जमा होणार ६ हजार रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सुमारे 10 कोटी शेतकर्‍यांना मोठा आधार मिळालेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा आता परप्रांतीय कामगारांनाही घेता येणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी यासंबंधिची माहिती दिली आहे. यासाठी कामगारांनी फक्त तीनच कागदपत्रे म्हणजेच शेत जमीनीची कागदपत्रे, बँक खाते क्रमांक आणि आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. जे कामगार या अटी पूर्ण करतात त्यांनी रजिस्ट्रेशन करावे, सरकार त्यांना पैसे देण्यास तयार आहे. त्या कामगारांच्या नावावर कोठेतरी एक शेतजमीन असली पाहिजे. आता रजिस्ट्रेशनसाठी त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही, हीयोजना वेबसाइटवरच जाऊन, त्याच्या फार्मर कॉर्नरद्वारे अर्ज करता येईल.

फक्त सर्व कागदपत्रे असली पाहिजे
कैलास चौधरी यांनी दिलेल्या माहितीत असे सांगितले गेले आहे की, या योजनेच्या रजिस्ट्रेशनसाठी आपल्याकडे आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. याशिवाय शेतीच्या जमीनीची कागदपत्रेही असावीत. राज्य सरकार या आकडेवारीची पडताळणी करते, त्यानंतर केंद्र सरकार पैसे पाठवते.

घरी बसूनच या योजनेत रजिस्ट्रेशन करा.

स्टेप-1 आपल्याला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी सुरू केलेल्या अधिकृत वेबसाइट                    https://www.pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.

स्टेप-2 येथे आपण होमपेज वरील टॅबमधून ‘Farmers Corner’ या टॅबवर क्लिक करावे लागेल.

स्टेप-3 येथे दिलेल्या पर्यायांमधून तुम्हाला ‘New Farmers Registration’ हा पर्याय निवडावा लागेल.

स्टेप-4 त्यानंतर, नवीन पेज उघडेल. यात आपल्याला आपला आधार नंबर टाकावा लागेल आणि समोर लिहिलेला कॅप्चा कोड भरावा करावा लागेल.

स्टेप-5 आपले डिटेल्स याआधी दिले केले गेले नव्हते, म्हणून त्यावर ‘record not found’ असे लिहून येईल. त्याखाली ‘New Farmers Registration’ हा पर्याय देखील असेल. त्यावर क्लिक करा.

स्टेप-6 आता आपल्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म येईल. येथे आपल्याला आपले राज्य, जिल्हा, गट, गाव, नाव, प्रवर्ग, लिंग, शेत एकर, बँकेचे नाव, आधार कार्ड, बँक खाते आणि आयएफएसी क्रमांक, मोबाइल क्रमांक, जन्म तारीख आणि वडिलांचे नाव इत्यादी माहिती भरावी लागेल. [/hq]

स्टेप 7 संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर खाली दिलेली सर्व माहिती बरोबर आहे, पडताळणीसाठी तपासून घ्यावे लागेल. आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करावे लागेल.

स्टेप-8 यासह आपली रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया पूर्ण होईल. आपण दिलेली माहिती योग्य असल्याचे आढळल्यास आपल्या मेसेज द्वारे सांगितले जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment