सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेत एकच नाणे… नारायण राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिंधुदुर्ग | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेत 19 पैकी 10 जागा जिंकून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सत्ता मिळविण्यात यश मिळवले आहे. संतोष परब हल्ला प्रकरणामुळे गेल्या चार दिवसापासून कोकणात राजकीय नाट्य सुरू असल्याचे पहायला मिळाले. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला या सर्व पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून होते. यावेळी विजयानंतर राणे समर्थकांनी एकच नाणे नारायण राणे अशा घोषणा दिल्या.

संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आणि भाजपचे उमेदवार मनिष दळवी या निवडणुकीत विजयी झाले आहेत. याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विलास गावडेंचा पराभव केला आहे.  सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 19 जागांसाठी मतमोजणी झाली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून हा राजन तेली यांचा पराभव झाला आहे. याठिकाणी महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी झाले आहेत. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू विजयी झाले आहेत.

सम- समान मतांमध्ये  भाजपाची बाजी

तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश सावंत आणि भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई यांना समसमान मते मिळाली आहेत. त्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सतीश सावंत पराभूत झाले आहेत. सावंत हे माजी अध्यक्षही होते. त्यांच्याच नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात आली होती. त्यांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

1. शेती संस्था मतदारसंघ दोडामार्ग तालुका- प्रकाश गवस (भाजप) पराभूत, गणपत देसाई (महाविकास आघडी) विजयी

2. शेती संस्था मतदारसंघ कुडाळ तालुका – प्रकाश मोर्ये (भाजप)- पराभूत, विद्याप्रसाद बांदेकर (महाविकास आघाडी) – विजयी, सुभाष मडव (अपक्ष)- पराभूत.

3. शेती संस्था मतदारसंघ देवगड तालुका- प्रकाश बोडस (भाजप)- विजयी, अविनाश माणगावकर (महावि. आघा.)- पराभूत,

4. शेती संस्था मतदारसंघ कणकवली तालुका – सतीश सावंत (महाविकास आघाडी)- पराभूत, विठ्ठल देसाई (भाजप)- विजयी

5. मच्छीमार संस्था सर्व दुग्ध संस्था कुक्कुटपालन, वराहपालन जनावरे पैदास करणाऱ्या संस्था मतदारसंघ-महेश सारंग (भाजप)- विजयी, मधुसूदन गावडे (महाविकास आघाडी)- पराभूत

6. सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ – अतुल काळसेकर (भाजप)- विजयी, सुरेश दळवी (महाविकास आघाडी)- पराभूत

7. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघ- राजन तेली (भाजप)- पराभूत. सुशांत नाईक (महाविकास आघाडी)- विजयी.

8. विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्था- विनोद मर्गज (महाविकास आघाडी)- पराभूत, संदीप परब (भाजप)- विजयी

9. कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघ – विकास सावंत (महाविकास आघाडी)- पराभूत, समीर सावंत (भाजप)-विजयी

10. शेती संस्था मतदारसंघ वैभववाडी – दिलीप रावराणे (भाजप) विजयी, दिगंबर पाटील (महाविकास आघाडी)- पराभूत

11. भाजपचे मनिष दळवी- विजयी
महाविकास आघाडीचे विलास गावडेंचा पराभव

Leave a Comment