मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांपैकी फक्त तिघांनाच मिळाली नोकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शुक्रवारी औरंगाबादेत जिल्हा दौऱ्यावर असताना अनिल परब यांनी मराठा समाजातील उर्वरित तरूणांचे अर्ज प्रक्रियेत असून प्रत्येकाला नोकरी मिळेल असे सांगितले आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस एसटी महामंडळामध्ये नोकरी देऊ अशी घोषणा केली होती. याच घोषनेनुसार 9 जणांना एसटी महामंडळात नोकरी देण्यात आली आहे.

शुक्रवारी परिवहनमंत्री अनिल परब हे जिल्हा दौऱ्यावर होते. औरंगाबाद येथे आल्यानंतर त्यांनी एसटी महामंडळाच्या चिकलठाणा कार्यशाळेला भेट देत माहिती घेतली.‘मराठा आरक्षणातील बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांच्या नोकरीच्या प्रश्‍नासंदर्भात त्यांच्या नातेवाईकांना पत्र पाठवलेले आहे. आम्हाला गृह विभागातर्फे (होम डिपार्टमेट) क्लिअरंन्स येत आहे. त्यांना नोकरी देण्यात आलेली आहे. आतापर्यंत नऊ जणांना एसटी महामंडळात नोकरी मिळाली आहे. इतरांच्या नोकरीचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. उर्वरितांच्या अर्जांची छाननी चालू आहे. यात प्रत्येकाला नोकरी मिळेलच ,असे मी आश्‍वासन देतो, असे अनिल परब यांनी सांगितले.

रवी केशव चौधरी यांना लिपीक, सुनील कारभारी शेळके हे वाहक तर भगवान जगन्नाथ सोनवणे यांना स्वच्छक म्हणून या मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांपैकी तिघा जणांना एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात नोकरी मिळाली आहे. तसेच गल्ले बोरगाव येथील किशोर हरदे यांचा भाऊ कल्याण हरदे आणि उमेश एंडाईत यासह इतर लोक प्रतिक्षेत आहेत.

Leave a Comment