घरबसल्या कोणत्याही डॉक्युमेंट शिवाय उघडा SBI मध्ये खाते, मिळतील अनेक फायदे; जाणुन घ्या सोपी प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट नसेल तरी एसबीआय मध्ये खाते उघडता येणार आहे. एसबीआयद्वारे सुरु करण्यात आलेल्या बचत खाते उघडण्याच्या या प्रक्रियेत खातेधारक व्यक्तीला कोणत्याच केवायसी डॉक्युमेंटची आवश्यकता नसणार आहे. एसबीआय नेहमीच्या बचत खात्यासोबत एक छोटे बचत खाते उघडण्याचा पर्याय देते आहे. १८ वर्षाच्या पुढील व्यक्ती केवायसी शिवाय हे खाते उघडू शकतात. डॉक्युमेंट जमा केल्यावर हे खाते सामान्य खात्यात परिवर्तित होते.

एसबीआय च्या नुसार छोटे खाते उघडणाऱ्या व्यक्तीला बँकेच्या अधिकृत बँक अधिकाऱ्यांकडे एक सेल्फ-अटेस्टेड फोटोग्राफ आणि सही अथवा अंगठ्याचा शिक्का जमा करावा लागणार आहे. या खात्यात कमीतकमी बॅलन्स ठेवण्याची काही झंझट नाही आहे. या खात्यात जास्तीत जास्त ५०.०००रु ठेवता येऊ शकतात. बचत खात्याप्रमाणे या खात्यातही व्याज मिळणार आहे. १ कोटी बॅलन्स साठी वार्षिक ३.५०% आणि १ कोटीपेक्षा अधिक साठी वार्षिक ४% व्याज मिळणार आहे. या खात्यासाठी मोफत एटीएम कार्ड ही दिले जात आहे. अकॉउंटसाठी कोणतीच मेंटेनन्स फी नाही आहे. सामान्य बचत खात्याप्रमाणे डिपॉझिट, एटीएम कॅश विथड्रॉल, इंटरनेट बँकिंग, फंड ट्रान्सफर, केंद्र व राज्‍य सरकार कडून दिली जाणारी चेक डिपॉझिटची सुविधा या सर्व सुविधा फ्री असणार आहेत. तसेच अकॉउंट बंद करायलाही चार्ज लागणार नाहीत.

या खात्यात ५०,००० रु पेक्षा अधिक बॅलन्स ठेवता येणार नाही आहे. तर एका महिन्यात १०,०००रु पेक्षा जास्त रक्कम काढता अथवा एखाद्याच्या खात्यावर भरता येणार नाही.एका वित्तीय वर्षात १ लाखापेक्षा अधिक रक्कम क्रेडिट करता येणार नाही. जर एक लाखापेक्षा अधिक क्रेडिट किंवा ५०,००० पेक्षा अधिक बॅलन्स झाल्यास केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय हस्तांतरण व्यवहार करता येऊ शकणार नाही. एका महिन्यात ४ पेक्षा जास्त विथड्रॉल केले जाऊ शकणार नाहीत. यामध्ये बँकेच्या अथवा इतर बँकेच्या एटीएम मधून पैसे काढणे, इंटरनेट बँकिंग, ट्रान्झॅक्शन, फंड ट्रान्सफर यांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment