उघड्यावर अंत्यसंस्कार : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील लोहारवाडी स्मशानभूमीचा प्रश्न केव्हा सुटणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील काळगाव (ता. पाटण) येथील लोहारवाडीला गेल्या पाच वर्षापासून स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. तर चार दिवसापूर्वी अतिवृष्टीत एका मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तात्पुरते शेड उभारावे लागले. लोहारवाडी ग्रामस्थांच्या या अडचणीकडे पाटणच्या दोन्हीही गटाच्या लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याने लोकांच्यात नाराजी आहे.

गेल्या चार वर्षापासून पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागातील काळगांव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या लोहारवाडी या गावात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. उन्हाळा आणि हिवाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना कमी प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र पावसाळ्यात दरवर्षीच एखाद्याचा मृत्यू झाल्यास पाऊस थांबण्याची वेळ पाहवी लागते. तर पाऊस थांबत नसल्यास तात्पुरते शेड उभारणे किंवा पर्यायी गोष्टी कराव्या लागतात. परंतु तोपर्यंत मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हा दोन- दोन दिवस घरात ठेवावा लागत आहे. तेव्हा या गावच्या स्मशानभूमीकडे लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार असा सवाल येथील नागरिकांच्यातून केला जात आहे.

काळगावपासून सुमारे एक किलोमीटरवर डोंगरात सहाशे लोकवस्तीची लोहारवाडी आहे. तेथील गावाजवळ माळरानावर असलेल्या स्मशानभूमीतील शेड व प्राथमिक शाळेची इमारत आहे. पाच वर्षापूर्वी 2017 वर्षापूर्वी वादळात उद्ध्वस्त झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्याच्या दुरुस्तीची मागणी केली. मात्र, शाळेची दुरुस्ती करण्यात आली. नवीन स्मशानशेड उभारणीची आजतागायत प्रतीक्षा कायमच सध्या जुन्या स्मशानभूमीच्या जागेवर मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असले तरी पावसाळ्यात गावामध्ये  झाल्यास उपड्यावर अंत्यसंस्कार करण्याशिवाय ग्रामस्थांसमोर दुसरा पर्यायच उरलेला नाही.चार दिवसांपूर्वीही तेथे असाच प्रसंग उद्भवला. गावातील एका व्यक्तीचे अकस्मात निधन झाले. मात्र, धो-धो पाऊस सुरू असल्याने ग्रामस्थांनी पत्रे बांधून मांडव उभारला आणि त्यातच चिता रचून अंत्यसंस्कार करण्यात आले.

आतातरी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे ः उमेश लोहार

लोहारवाडी येथे महिला पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून 2007 साली बांधलेली स्मशानभूमी 2017 साली शाळा व स्मशानभूमी शेडही उडून गेले. तेव्हापासून उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहोत. चार दिवसांपूर्वी एका मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तात्पुरते शेड उभारावे लागले. मात्र सोसाट्याचा वारा, पाऊस यामुळे अंत्यसंस्कार करताना अडचणी आल्या. तेव्हा आतातरी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश लोहार यांनी केली आहे.

Leave a Comment