नवी दिल्ली । जर तुम्ही अद्याप प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत खाते उघडले नसेल तर लगेच अशा प्रकारे खाते उघडा. सरकारने सुरू केलेल्या सर्वात महत्त्वाकांक्षी आर्थिक कार्यक्रमांपैकी हा एक आहे. या योजनेंतर्गत गरीबातील गरीब व्यक्ती त्यांचे बँक खाते उघडू शकतात. ज्यामध्ये अनेक वेगवेगळे आर्थिक लाभ मिळतात. चला तर मग या फायद्यांविषयी जाणून घेऊयात …
जन धन खाते म्हणजे काय?
प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) हा सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक कार्यक्रम आहे जो बँकिंग/सेव्हिंग आणि डिपॉझिट्स अकाउंट, प्रेषण, कर्ज, विमा, पेन्शनमध्ये प्रवेश सुनिश्चित करतो. हे खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आउटलेटवर उघडले जाऊ शकते. PMJDY खाती झिरो बॅलन्स ठेवून उघडली जात आहेत.
1.30 लाख रुपये नफा मिळवा
प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यात खातेदाराला एकूण 1.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. यामध्ये एक्सिडेन्टल इन्शुरन्सही दिला जातो. खातेदाराला 1,00,000 रुपयांचा एक्सिडेन्टल इन्शुरन्स आणि 30,000 रुपयांचा नॉर्मल इन्शुरन्स दिला जातो. अशा परिस्थितीत खातेदाराचा अपघात झाल्यास 30 हजार रुपये दिले जातात. या अपघातात खातेदाराचा मृत्यू झाल्यास एक लाख रुपये दिले जातात, म्हणजेच एकूण 1.30 लाख रुपयांचा लाभ मिळतो.
खाते कसे उघडायचे?
प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाते उघडले जाते. मात्र, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जन धन खाते खाजगी बँकेत देखील उघडू शकता. तुमचे दुसरे बचत खाते असल्यास तुम्ही ते जन धन खात्यातही बदलू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून जास्त आहे, तो जन धन खाते उघडू शकतो.
‘हे’ डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत
जन धन खाते उघडण्यासाठी KYC अंतर्गत डॉक्युमेंट्सचे व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. या डॉक्युमेंट्सचा वापर करून जन धन खाते उघडता येते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड हवेत.
जन धन खात्यात ‘हे’ फायदे मिळतील
1. खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची कोणतीही अडचण नाही.
2. बचत खात्याइतकेच व्याज जमा होत राहील.
3. मोबाईल बँकिंगची सुविधाही मोफत असेल.
4. प्रत्येक युझर्ससाठी 2 लाख रुपयांपर्यंतचा एक्सिडेन्टल इन्शुरन्स कव्हर.
5. 10 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा.
6. रुपे कार्ड कॅश पैसे काढण्यासाठी आणि खरेदीसाठी उपलब्ध आहे.