व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Post Office मध्ये प्रीमियम बचत खाते उघडून मिळवा ‘या’ सुविधांचा लाभ !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Post Office कडूनही अनेक प्रकारच्या बँकिंगच्या सुविधा दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे गुंतवणुकीसाठी अनेक प्रकारच्या योजना देखील चालवल्या जात आहेत. ज्याचा लाभ देशभरातील कोट्यवधी लोकं घेत आहेत. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची वाढती संख्या लक्षात घेता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) प्रीमियम सेवा सुरू केली आहे.

QR Cards by India Post Payments Bank – An Alternative to ATM Cards

ज्याअंतर्गत, प्रीमियम बचत खाते उघडता येते. तसेच यामध्ये अनेक प्रकारच्या प्रीमियम सेवा देखील दिल्या जात आहेत. Post Office च्या प्रीमियम खात्याद्वारे डोअरस्टेप बँकिंगसारख्या अनेक सुविधा देखील मिळत आहेत. चला तर मग या खात्याविषयीच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

India Post Payments Bank (IPPB) offers 3 types of savings accounts. Which  one to choose | Mint

मिळतील ‘या’ सुविधा

Post Office च्या प्रीमियम बचत खात्यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. यामध्ये कर्ज, व्हर्च्युअल डेबिट कार्ड, डोअर स्टेप बँकिंगसारख्या सुविधांचा समावेश आहे. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये प्रीमियम बचत खाते उघडून कर्जही घेता येते. याशिवाय आपल्याला घरबसल्या डोअर स्टेप बँकिंगद्वारे कर्जासाठी अर्ज करता येईल. यामध्ये व्हर्च्युअल डेबिट कार्डची सुविधा देखील मिळते. तसेच या खात्याद्वारे बिले भरल्यास कॅशबॅक देखील मिळेल.

Govt Mulls Tie Up Between India Post Payments Bank and WhatsApp: See What's  on Cards

डिजिटल ट्रान्सझॅक्शन करणाऱ्यांसाठी फायदेशीर

जास्त डिजिटल ट्रान्सझॅक्शन करणाऱ्यांसाठी हे खाते खास डिझाइन केलेले आहे. या खात्यातून इतर कोणत्याही Post Office खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केल्यास त्यावर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र, इतर बँकांच्या खात्यांसाठी वेगळे शुल्क भरावे लागेल. यामध्ये पेन्शनधारकांना डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची सुविधाही मिळते.

Explained: India Post Payments Bank, in 5 points | Mint

फक्त ₹149 मध्ये उघडा ‘हे’ खाते

जवळच्या Post Office मध्ये जाऊन हे खाते उघडता येईल. तसेच पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवेद्वारेही हे खाते उघडता येते. पोस्ट ऑफिसच्या प्रीमियम खात्यासाठी दरवर्षी 99 रुपये वार्षिक शुल्क भरावे लागेल. त्याचबरोबर खाते उघडल्यावर 149 रुपयांसहीत जीएसटी स्वतंत्रपणे भरावा लागेल. या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्सची कोणतीही मर्यादा नाही.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.ippbonline.com/

हे पण वाचा :
Jio कडून ग्राहकांना धक्का, ‘हा’ रिचार्ज प्लॅन 100 रुपयांनी महागला
येत्या 7 दिवसात पूर्ण करा ‘ही’ 5 महत्वाची कामे अन्यथा मिळू शकेल Income Tax ची नोटीस
Bank Account बंद करताय जरा थांबा… लक्षात घ्या ‘या’ 5 गोष्टी !!!
New Business Idea : वर्षभर मागणी असणारा ‘हा’ व्यवसाय सुरु करून मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न
हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये शेअर्स डंप केल्याचा आरोप असलेल्या Amrita Ahuja कोण आहेत ? जाणून घ्या त्यांचे भारत कनेक्शन