Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील ‘ही’ विमानतळे बंद; लगेच चेक करा

Operation Sindoor airport closed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Operation Sindoor। भारताने जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत. या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असं नाव देण्यात आल असून पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील अनेक भागात क्षेपणास्त्रे डागली आहेत. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सुद्धा चवताळला आहे. दोन्ही देशातील संबंध आणखी तणावाचे झाले आहेत. भारताच्या एअर स्ट्राईक नंतर सीमाभागात पाकिस्तानकडून मंगळवारी रात्रीपासूनच कुरापती वाढल्या आहेत. शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यासोबतच पाककडून सातत्यानं भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी काही महत्त्वाच्या आणि स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत.

याबाबत इंडिगो एअरलाइन्सने एक एडवाइजरी जारी केली आहे की, एअरस्पेसमध्ये होणाऱ्या बदलांच्या अनुषंगानं श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगढ आणि धरमशाला येथील ये-जा करणाऱ्या सर्व फ्लाईट अर्थात उड्डाणं प्रभावित होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे विमानतळावर येण्यापूर्वी https://bit.ly/31paVKQ येथे तुमच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो असं इंडिगो ने म्हंटल आहे.

दुसरीकडे, स्पाइसजेट एअरलाइन्सने सुद्धा ट्विट करत म्हंटल की, सध्याच्या परिस्थितीमुळे, उत्तर भारतातील काही भागांमध्ये, धर्मशाला (DHM), लेह (IXL), जम्मू (IXJ), श्रीनगर (SXR) आणि अमृतसर (ATQ) सह विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद आहेत. प्रस्थान आणि आगमन उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो. प्रवाशांना त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा आणि विमानाची स्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

भारताने कोणकोणत्या भागात एअर स्ट्राईक केला? Operation Sindoor

१) बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर

2) मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर

3) सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर

4) गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा 
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी 

5) बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर

6) कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.

7) बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा 
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर 

8) सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा 
सीमेपासून 8 कि.मी.दूर

9) महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर